📍 राजुर, ता. अकोले अकोले दौऱ्यात आमदार सत्यजीत तांबे यांनी आज श्री स्वामी समर्थ सेवा संस्था, राजुर संचलित श्री स्वामी समर्थ माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, राजुर येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेतील शैक्षणिक उपक्रमांची माहिती घेतली तसेच विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा आढावा घेतला. यावेळी संस्थेच्या शैक्षणिक व मूलभूत समस्या लक्षात घेता आमदार सत्यजीत तांबे यांनी शिक्षण उपसंचालक, पुणे यांना फोनवरून संपर्क करून सोडविण्यासाठी सूचना दिल्या. तसेच उपस्थित शिक्षक, विद्यार्थी आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी नव्या पिढीला सक्षम बनविण्यासाठी संस्थेने केलेली पायाभूत सुविधा आणि विविध उपक्रम पाहून समाधान व्यक्त करत भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. @satyajeettambe #satyajeettambe #Rajur #Akole #SchoolVisit #EducationForAll #StudentDevelopment #FutureGeneration #EducationalInitiatives #Inspiration #Leadership #communitydevelopment